मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भातील बैठक राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात बुधवार (दिनांक 1 बुधवार) रोजी संपन्न झाली. ( Meeting Held In Ministry At Mumbai Regarding Rehabilitation Of Dam Victims In Maval Taluka Minister Shambhuraj Desai MLA Sunil Shelke Were Present )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवना धरणासाठी मावळ तालुक्यातील जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे 57 वर्षे उलटून गेले तरीही अद्याप पुनर्वसन झालेले नाही. तसेच जाधववाडी, आंद्रा, शिरे-शेटेवाडी या प्रकल्पग्रस्तांचेही पुर्नवसन होऊ शकले नाही. याबाबत अनेकदा विधिमंडळात आमदार शेळके यांनी आवाज उठवला होता. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात (23 डिसेंबर 2022) हा प्रश्न आमदार शेळकेंनी लक्षवेधी द्वारे उपस्थित केला होता, तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकरी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करु, असे उत्तर दिले होते. त्याच अनुषंगाने बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.
हेही वाचा – ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ
जमीन वाटप प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन निर्णयाचा आदर राखून प्रकल्पग्रस्त शेतकरी, खातेदार, गावनिहाय जमिनी याबाबतचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला मंत्री देसाई, आमदार शेळके यांसमवेत मदत व पुनर्वसन विभाग कक्ष अधिकारी अभिजीत गावडे, उपजिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, धोडपकर, उपअभियंता अशोक शेटे, धरणग्रस्त शेतकरी, प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन; हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पुस्तके उपलब्ध
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षपदी सारिका ढमाले
– दुःखद बातमी : कामशेतजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू