मावळ तालुक्यातील काले – पवनानगर येथील पवना कृषक सेवा सहकारी संस्थेवर सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, मावळ) एस. बी. घुले यांच्या आदेशान्वये 6 अशासकीय प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त अशासकीय प्रशासकांनी आज (गुरुवार, 2 फेब्रुवारी) कार्यभार स्विकारला. त्यानंतर मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अशासकीय प्रशासकांमध्ये विठ्ठल घारे, सिद्धू दळवी, सूर्यकांत सोरटे, शामराव शिंदे, तानाजी आडकर, विश्वनाथ (बाळासाहेब) जाधव यांचा समावेश आहे. या सर्व अशासकीय प्रशासकांचा कालावधी हा पुढील सहा महिने असेल, या कालावधीत विहित नियमांनुसार निवडणूका घेऊन कार्यभार नवीन समितीच्या हाती देणे, हे प्रमुख कार्य असेल. ( Non Government Administrators Appoint At Pavana Krishak Seva Cooperative Society Limited Pavananagar Maval )
याप्रसंगी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी उपसभापती शांताराम कदम, गणेश धानिवले, गणेश कल्हाटकर, शत्रुघ्न धनवे, माऊली ठाकर, नारायणराव बोडके, कोथूर्णेचे सरपंच प्रमोद दळवी यांच्यासह पवनानगर भागातील पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शंभूराज देसाईंनी आमदार शेळकेंना दिलेलं आश्वासन पाळलं, मावळमधील धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न
– तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन; हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पुस्तके उपलब्ध