मौजे पाथरगाव गावच्या हददीत (ता. मावळ, जि. पुणे) दिनांक 03 नोव्हेंबर 2022 रोजी वैभव अशोक गोयल चॅरीटेबल फाउंडेशनच्या जागेत वॉल कंपाउंडचे काम करणारे बांधकाम व्यवसायिक ऋषिकेश म्हाळसकर आणि त्याचे वडील अशोक म्हाळसकर, त्यांचा कामगार निलेश खेडकर यांना खंडु कुटे, प्रविण ऊर्फ बाळा बालगुडे आणि त्यांचे इतर दोन साथिदारांनी शिवीगाळ आणि दमदाटी करुन, लाकडी काठीने मारहाण केली होती. तसेच ऋषिकेश म्हाळसकर याचे कपाळावर पिस्तूल लावून त्याच्या बांधकाम साईटवर मटेरीयल सप्लायचे काम नाहीतर एक लाख रुपयाची मागणी केली. तसेच पैसे दिले न दिल्यास काम करुन देणार नाही, अशी दमदाटी केली होती. ( Accused of Serious Crime Arrested By Kamshet Police Pistol And Cartridge Seized )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी ऋषिकेश म्हाळसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कामशेत पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 387, 452, 324, 323, 504, 506, 34 भा. ह. का. कलम 3, 25 प्रमाणे दिनांक दिनांक 04 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी 1) खंडु भगवान कुटे उर्फ खंड्या (वय 27 वर्षे, रा ताजे, ता मावळ, जि पुणे) 2) प्रविण ऊर्फ बाळा किसन बालगुडे (रा पाथरगाव ता मावळ जि पुणे) आणि त्याचे इतर दोन साथीदार गुन्हा केल्यापासून फरार होते.
सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरीता कामशेत पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय जगताप आणि सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी आकाश पवार (सहा. पोलीस निरीक्षक) यांनी कामशेत पोलीस स्टेशन कडील सर्व अंमलदारांना वेळोवेळी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस हवालदार दिक्षीत यांना आरोपी खंडु कुटे हा ताजे येथील डोंगरात असल्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे रहीस नजीर मुलाणी यांच्या मदतीने आरोपीला अत्यंत शिताफीने पकडले. ( Accused of Serious Crime Arrested By Kamshet Police Pistol And Cartridge Seized )
हेही वाचा – दुःखद बातमी : कामशेतजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार आकाश पवार (सहा. पोलीस निरीक्षक) यांनी आरोपी खंडु भगवान कुटे उर्फ खंड्या (वय 27 वर्षे, रा ताजे, ता मावळ, जि पुणे) याला अटक करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोठडी दरम्यान तपास करुन त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेले एक गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतूसे जप्त केली आहेत. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी देखील आरोपी खंडु कुटे याच्यावर मावळ तालुक्यात कामशेत, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरीचोरी, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी अंकित गोयल (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण), मितेश घटटे (अप्पर पोलीस अधिक्षक), सत्यसाई कार्तिक (सहा. पोलीस अधिक्षक, लोणावळा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप (पोलीस निरीक्षक) आकाश पवार (सहा. पोलीस निरीक्षक) सहाय्यक फौजदार अब्दुल शेख, पोलिस हवालदार जीतेंद्र दिक्षीत, पोलिस हवालदार संदीप शिंदे, पोलिस हवालदार रविंद्र राय, पोलिस कॉन्स्टेबल आशिष झगडे, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र राउळ, पोलिस कॉन्स्टेबल डोईफोडे आणि सर्व कामशेत पोलीस स्टेशन आणि पोकॉ रहीस नजीर मुलाणी, लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– पवना कृषक सेवा सहकारी संस्थेवर 6 प्रशासकांची नियुक्ती; बाळा भेगडे आणि मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त प्रशासकांचा सत्कार
– शंभूराज देसाईंनी आमदार शेळकेंना दिलेलं आश्वासन पाळलं, मावळमधील धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न