बसमधील सहप्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्ती विरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर उर्से टोलनाक्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा प्रकार घडला.
सदर प्रकरणी एम.एच. 14 बी.टी. 4771 या बसमधील प्रवासी महिलेने शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी चंद्रकांत भिकाजी जाधव (वय 44, व्या. नोकरी, रा. गोवंडी, लिंबोनी बाग, रूम नं. 116 मुंबई) याच्यावर भारतीय दंड विधान कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Case Registered In Shirgaon Police Station Against Person Who Molested Female Passenger Maval Crime )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या फलटण येथून एसटी क्रमांक एम.एच. 14 बी.टी. 4771 यात बसून कळंबोली मुंबई करिता प्रवास करत होत्या. तेव्हा बसमधून प्रवास करत असताना उर्से टोलनाका इथे बस आली असता आरोपीने फिर्यादी यांच्या शेजारी बसून झोपेचे सोंग करून डावे मांडीवर हात फिरवून वाईट उद्देशाने फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक कांबळे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल
– रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाद, 70 वर्षीय वृद्धावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न, बेबडओहळ येथील धक्कादायक प्रकार!