तळेगाव ते चाकण मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या काही केल्या होताना दिसत नाही. तळेगाव दाभाडे शहराजवळ माळवाडी हद्दीत आज (रविवार, 19 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले, तर ऑटो चालकही किरकोळ जखमी झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चाकणहून तळेगावच्या दिशेने वेगाने निघालेल्या ट्रक (क्रमांक एमएच 46 एआर 1551) चालकाने अचानक ब्रेक टाबून ट्रक बाजूला घेतल्याने पाठीमागून येत असलेल्या रिक्षा (क्रमांक एमएच 14 एचएन 2308) चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा बाजूला पलटी झाली. ( Accident Involving Truck And Auto Rickshaw On Talegaon Chakan Road 2 Passengers Injured )
सुदैवाने या अपघातात कुणीही मृत्यू पावले नाही. परंतू, रिक्षातील एकूण 2 प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. तर इंदुरी येथील रिक्षाचालक वसंत रामचंद्र चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातात रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमी प्रवाशांची नावे समजू शकलेली नाहीत.
अधिक वाचा –
– गुडन्यूज..! सोमवारपासून पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या आणखीन दोन फेऱ्या, पाहा नवीन वेळापत्रक
– महाशिवरात्री निमित्त मोरया महिला प्रतिष्ठानकडून महाप्रसाद वाटप; नगराध्यक्ष मयूर ढोरेंनी स्वतः वाटला भाविकांना प्रसाद