मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग सुवर्णपदके मिळवले आहे. 2018 साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या 217 मध्ये तृप्ती ने थायबाँक्सिग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता, तर भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक ची कमाई केली होती.
आसाम येथे याच स्पर्धेत रजतपदक मिळवले आहे. गोवा येथे आंतराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तर याआधी अनेक स्पर्धेत तब्बल 62 पदके मिळविले आहे. ( Womens Day Special Trupti Shamrao Nimble From Maval Taluka Won Gold Medals In Thai Boxing )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तृप्ती ची घरची परिस्थिती बेताची असुन तिला अनेक स्पर्धेत भारत देशाचे नाव देशाच्या विविध देश पातळीवर उचवायचे असल्याचे तिने सांगितले आहे. तृप्ती हि उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर येथे शिकत असुन ती आता बी.पी.ए.एड वर्षाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
तृप्तीला खेळाचे बाळकडू हे घरातुनच मिळाले आहे. तिचे वडिल हे पुणे जिल्यातील कुस्तीक्षेत्रातील मल्लसम्राट शामराव निंबळे अशी ओळख आहे. शामराव निंबळे यांना तीन मुली प्रिती,तर दुसरी करिष्मा व तृप्ती तर आई गृहणी जिजाबाई आहे. तर तिचा भाऊ हा कुस्तीक्षेत्रातच होता. सन 2014 मध्ये त्याचे आपघाती निधन झाले.
त्यामुळे तृप्ती ने बोलताना सांगितले की मला माझ्या भावाचे व वडिलांचे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खेळले असुन अनेक पदके मी भुषीविली असुन मी यापुढेही खेळतच राहणार असुन यापुढे हि मी देशासाठी खेळणार असल्याचे तिने सांगितले आहे. तृप्ती ची मोठी बहिण करिष्मा सनी बारणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहे. तृप्ती मुळे संपूर्ण मावळ सह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हाचे नाव लैंकीक झाले आहे. तृप्ती ला टि.वाय.अत्तर याचे मार्गदर्शन लाभले आहे.
तृप्ती ने सांगितले की, महिलांनी क्रिडा क्षेत्रात काम करुन देशाचे नाव पुढे घेऊन जावे व एकदा क्रिडा क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात पंरतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवावी लागते यामुळे मी आज विविध राज्य व देशभरात खेळून आले असल्याने मला या सर्व गोष्टी चा अनूभव आहे. मी यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे व माझ्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार आहे.मला यापुढे शासकीय अधिकारी बनुन देशसेवा करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
छायाचित्र – तृप्ती निंबळे
माहिती स्त्रोत – सचिन ठाकर
अधिक वाचा –
– तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ
– महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावत मारहाण आणि लुटमार करणाऱ्या टोळीचा कामशेत पोलिसांकडून पर्दाफाश