बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. अनुपम खेर यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ( Bollywood Actor And Filmmaker Satish Kaushik Passed Away At Age Of 66 In Delhi Due To Heart Attack )
सतीश कौशिक हे बुधवारी गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते, तिथून परतत असताना त्यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल सर्वाक आधी अनुपम खेर यांनी माहिती दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले कीस मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. मात्र, माझ्या मित्रासाठी मला हे लिहावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीवर असा अचानक पूर्णविराम!!
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! ???????????? pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
Can’t believe you are gone. Your hearty laugh still rings in my ears. Thank you for being a kind and generous co actor, thank you for being a silent teacher. You will be missed, your legacy will live on in our hearts. #SatishKaushik ji #RestInPeace pic.twitter.com/JpZ6K2ETkr
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 9, 2023
दिनांक 13 एप्रिल रोजी 1965 मध्ये हरियाणा इथे जन्मलेले सतीश कौशिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक तसेच निर्माता होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. कौशिक यांना खरी ओळख मिळाली 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटातून. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1990 च्या रामलखन आणि 1997 च्या साजन चले ससुराल साठी सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेतेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
अधिक वाचा –
– महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध
– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त