व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष

आढले खुर्दच्या मावळत्या उपसरपंच चैत्राली पशाले यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Adhale-Khurd-Gram-Panchayat-Maval

Photo Courtesy : Mahendra Bhoir


मावळ तालुक्यातील आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आढले खुर्दच्या मावळत्या उपसरपंच चैत्राली पशाले यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी बुधवारी निवड प्रक्रिया पार पडली. यात पप्पूशेठ चांदेकर यांची उपसरपंच पदी निवड झाली. ( Pappu Chandekar Elected Unopposed Deputy Sarpanch Of Adhale Khurd Gram Panchayat Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चैत्राली पशाले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच नंदा भालेसेन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी पप्पू चांदेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या ग्रामसेविका पुनम जमदाडे यांनी चांदेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पप्पूशेठ चांदेकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सरपंच नंदा भालेसैन, ग्रामसेविका पुनम जमदाडे, माजी उपसरपंच चैत्राली पशाले, योगेश (आण्णा) भोईर, मंदा घोटकुले, मंगेश येवले, सोनल जगदाळे आदीजण यावेळी उपस्थित होते. पप्पू चांदेकर यांच्या निवडीनंतर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आल्या.

हेही वाचा – महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध

पै बाळासाहेब घोटकुले (भाजपा युवा मोर्चा) दत्ता केदारी (चेअरमन खरेदी विक्री संघ) मा सरपंच दत्तोबा चांदेकर, मा सरपंच भाऊसाहेब भोईर, पै महेंद्र भोईर (खजिनदार भाजपा युवा मोर्चा) प्रल्हाद भालेसेन, मा सरपंच दिनेश कदम, बाबुराव येवले, बाळकृष्ण चांदेकर, पांडुरंग घोटकुले, तुकाराम चांदेकर, गणेश भोईर, शिवाजी भोईर, किसन जगदाळे, किरण काटे, विनोद भोईर, अरुण चांदेकर, प्रतिकेत भोईर, सोमनाथ पशाले, ओंकार भोईर, श्रीकांत केदारी आदींनी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा –

– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त
– तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Next Post

आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Caste-Certificate-To-Tribal-Community

आदिम कातकरी सेवा अभियान : दहिवली येथील आदिवासी बांधवांना आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून घरपोच जातीचे दाखले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.