ट्रकला चारचाकी घासून ट्रक चालकाला मारहाण करत लुटून पसार झालेल्या आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 6 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव चाकण रोड मच्छी मार्केट च्या समोर ही घटना घडली.
याप्रकरणी फिर्यादी मुकेश रामनाथ यादव (वय 45 वर्षे, रा. बरीयारामपुर पो सोरोकटराबझार ता. हाडीया .जि. इलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी, गाडी क्रमांक एम.एच 14 एच.डब्लू. 2070 आय 20 वरील चालक आणि त्याचा मित्र यांच्यावर दिनांक 7 मार्च रोजी दुपारी पाऊणे दोन वाजता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. ( Truck driver beaten and robbed on Talegaon-Chakan road case registered in Talegaon Dabhade police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 392, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख आणि वेळेला फिर्यादी त्यांचा टाटा ट्रक (क्रमांक जी.जे. 15 ए.व्ही. 9958) मधील माल मोशी गोडावून मध्ये उतरून चाकण तळेगाव गाव रोडने पनवेल कडे घेऊन जात होते. तेव्हा मार्गावरुन जात असताना तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटचे समोर साधारण रात्री साडेआठ वाजता फिर्यादी हे आले असता फिर्यादीच्या ट्रकच्या पाठीमागून डाव्या बाजूने फिर्यादीत नमूद आरोपीने ट्रकच्या पाठी मागील डाव्या बाजूकडे त्यांची चारचाकी गाडी आय-20 उजव्या बाजूने घासून आरोपींने फिर्यादीला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले.
हेही वाचा – धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू
त्यानंतर फिर्यादी बसलेल्या ड्रायव्हर सीटकडे येऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरायला सांगितले. तसेच ट्रकमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले असे सांगत फिर्यादीला ट्रकमधून खाली ओढून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यातील एका आरोपीने फिर्यादीकडे असलेला रुपये 5000 किंमतीचा मोबाईल फोन बळजबरीने खिशात हात घालून काढून घेतला. तसेच दुसऱ्या आरोपीने फिर्यादीचे खिशातील पर्स व पर्स मधील एकूण 4500 रूपये असे एकुण 9500 रुपयेचा मुद्देमाल आरोपींनी फिर्यादीकडुन जबरदस्तीने हिसकावून घेऊन तिथून पळ काढला, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक मदेवाड हे करत आहेत.
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाका हटवा..! कृती समितीकडून 9 मार्चला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक
– महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली