महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता, त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज यांच्या बीज दिनी त्यांना वंदन करुन देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. यावेळी राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा पाच घटकांवर म्हणजेच पंचामृतांवर आधारित असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर राज्यातील विविध घटक आणि क्षेत्राशी संबंधित तरतुदींचे वाचन करत असतानाच फडणवीसांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक नव्या तरतुदी आणि अनेक मोठ्या घोषणा केल्या. ( Maharashtra Budget 2023 Devendra Fadnavis Announced Free Uniform For Students Increase In Salary of Education Servants )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश…
एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ करत असतानाचा इयत्ता आठवी पर्यंत आता मोफत गणवेश देण्यात येणार आहेत.
– इयत्ता 5 ते 7 वी शिष्यवृत्ती रक्कम एक हजारवरुन 5 हजार रुपये
– इयत्ता 8 ते 10 वी शिष्यवृत्ती रक्कम दीड हजारवरुन हजारवरुन 7500 हजार रुपये
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत दिले जाणार.
शिक्षणसेवकांच्या मानधनात मोठी वाढ…
मागील अनेक वर्षांपासून शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी मागणी होत होती. अखेर शिंदे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात ही मानधन वाढ करण्यात आली आहे.
शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6 हजारवरुन 16 हजार रुपये
– माध्यमिक शिक्षण सेवक : 8 हजारवरुन 18 हजार रुपये
– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9 हजारवरुन 20 हजार रुपये
अधिक वाचा –
– शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी खास तरतूद, ‘या’ कार्यासाठी तब्बल 25 कोटी जाहीर
– ‘महा’बजेट 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली, आता इतक्या लाखांपर्यंत मोफत उपचार
– ‘महा’बजेट 2023 : फडणवीसांचे मोठे गिफ्ट, शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ जाहीर, वर्षाला मिळणार ‘इतके’ पैसे