लोक जनशक्ती पार्टी चे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण दिवंगत रामविलास पासवान यांचा मेणाचा पुतळा लोणावळा येथील सुप्रसिद्ध वॅक्स म्युझियम येथे बसवण्यासाठी पुणे शहर-जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, सरचिटणीस के.सी. पवार, बंडू वाघमारे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी शनिवारी लकी सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम चे संचालक ललित देवा यांची भेट घेतली आणि पुतळा निर्मिती, उभारणीबाबत चर्चा केली. यासाठी लागणारा खर्च लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पुणे शहर- जिल्हा यांच्यावतीने देण्यात येणार आहे. रामविलास पासवान यांचा जीवन परिचय आणि छायाचित्रे यावेळी वॅक्स म्युझियमकडे सुपूर्द करण्यात आली. ( Wax Statue Of Ram Vilas Paswan In Wax Museum In Lonavla Maval )
अधिक वाचा –
– पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमीपूजन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न, पहिल्या दिवशी तब्बल 7 लाखांची निधी जमा
– वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार – गडकरी