दिनांक 10 मार्च (शुक्रवार) रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन मावळ तालुक्यात शिलाटणे गावातील शिवभक्त परतीच्या मार्गावर असताना पुणेजवळ रावेत इथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात शिलाटणे गाव आणि मावळ तालुक्यातील इतर काही गावांतील एकूण 33 शिवभक्त जखमी झाले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यापैकी एका तेरा वर्षीय शिवभक्ताचा गुरुवारी (दिनांक 16 मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (शुक्रवार, 17 मार्च) रोजी आणखीन एका शिवभक्ताचा (वय 20 वर्षे) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पवना हॉस्पिटलमध्ये सुरु असलेली त्याची मृत्यूची झुंज आज दुपारी अपयशी ठरली आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा – अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा
उपचाराधीन असलेल्या गावातील मुलांपैकी दोघांचा लागोपाठ दोन दिवसांत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिलाटणे गाव पुर्णतः शोकसागरात बुडाले आहे. ( Maval Taluka Injured 20 Years Old Shivbhakt Karan Kondhbhar Of Shilatane Village Died During Treatment In Pvana Hospital Pune )
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म’हत्या, परिसरात खळबळ
– महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू