मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तळेगाव दाभाडे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सेवा निवृत्त नर्स ( परिचारिका ) यांनी त्यांच्या तळेगावमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस अधिकचा तपास करत आहे. ( Suicide Of Retired Nurse In Talegaon Dabhade City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर महिला या तळेगावातील पंचवटी कॉलनी भागात राहत होत्या. शुक्रवार ( दिनांक 17 मार्च ) रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिसचे पीएसआय धापटे मॅडम आणि सहकारी हे करत आहेत. वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी याबाबत माहिती दिली.
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
– येळसे गावात वीज कोसळून जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक, अवकाळी पावसामुळे पवनमावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान