मावळ तालुक्यात ( गुरुवार, दिनांक 16 मार्च) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकटासह मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये येळसे गावातील शेतकरी सुभाष खंडू कडू यांच्या शेतातील जनावरांनसाठी साठवून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्यावर विज पडून चारा भस्मसात झाला आहे. तसेच पवनमावळ भागातील गहु, हरभारा, काकडी, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी रबी हंगमातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Pune Lightning Struck Animal Fodder And All Fodder Burnt In Yelase Village Near Pavananagr )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अचानक झालेल्या आवकाळी पावसाने आताही मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साठून राहिले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे यातून मोठे नुकसान होत आहे.. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्यांवर कोसळलेले हे अस्मानी संकट पाहता, शेतकऱ्यांची साधी विचारपूस करायला आणि नुकसान पाहायला अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्याच्या बांधावर गेलेला नाही. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अधिकारी कधी येतील? असा प्रश्न सर्वसामान्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
येळसे, काले, कोथुर्णे, शिवली, महागांव, कडधे, करुंज, शिवणे, बौर, वारु, आर्डव, मळवंडी, आढे, सडवली, ओझर्डे, सडवली, उर्से या भागातील रब्बी हंगामातील पिकांच्या शेतीत पाणी साचून राहिल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर रब्बी पिकांचे नुसकानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.
“गुरुवारी झालेल्या आवकाळी पावसामुळे मी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर विज कोसळून चाऱ्याला आग लागून संपुर्ण चारा जळून गेला आहे. तसेच गहु,काकडी,मका व टोमॅटो पिकांचे मुठे नुसकान झाले आहे. गहु अजुन दोन आठवड्यात काढणीला आला होता तर टोमॅटो ला फुले लागली होती पावसामुळे सर्व फुले गळाली असल्याने आतातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे,” अशी मागणी शेतकरी सुभाष कडू यांनी केली आहे. ( Unseasonal Rain In Maval Taluka Pune Lightning Struck Animal Fodder And All Fodder Burnt In Yelase Village Near Pavananagr )
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
– तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके