राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील विधानसभेतील चर्चेत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आमदार शेळकेंनी मावळच्या विविध समस्यांना लाचा फोडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले सुनिल शेळके?
मागील 8-9 महिन्यांपासून आम्ही मागणी करत आहोत की, मावळ तालुक्यातील 4 पैकी एका तरी पुलाच्या कामासाठी आम्हाला निधी मिळावा, ते काम या सरकारच्या माध्यमातून व्हावे. परंतु एकाही पुलाच्या कामाला सरकारने मंजुरी दिली नाही. त्याचप्रमाणे पवना सिंचन योजनेंतर्गत अनेक गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तो प्रस्तावही जैसे थे स्वरूपात आहे.
मावळ तालुक्यात अनेक धरणे आहेत ज्यातून वीजनिर्मिती होते. काही वर्षांपूर्वी अपघात घडल्याने तिथे बोटिंग बंद करण्यात आले. भूमिपूत्रांसाठी बोटिंगचा व्यवसाय हा पोटापाण्याचा व्यवसाय होता. राज्य सरकारने वीजनिर्मिती होणाऱ्या धरणांमध्ये काही अंतर राखून बोटिंगसाठी परवानगी द्यावी, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व भूमिपूत्रांना रोजगार मिळेल. ( MLA Sunil Shelke demand to allow citizens of Maval taluka to start boating business )
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारांची निर्मिती व्हावी यासाठी नव्याने प्रकल्प तालुक्यात यायला हवेत. उद्योगांसाठी मावळ तालुक्यात पोषक वातावरण असून देखील वेदांता-फॉक्सकॉनसारखा प्रकल्प येथे येऊ शकला नाही. तसेच सध्या बंद असलेला जनरल मोटर्स प्रकल्प ह्युंदाई कंपनीला देत असताना स्थानिक भूमिपुत्र याठिकाणी कायमस्वरुपी काम करीत होते, त्यांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांचा देखील प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी यावेळी सुनिल शेळके यांनी राज्य सरकारकडे केली.
अधिक वाचा –
– रविंद्र भेगडे यांचे 2024 च्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट मत – व्हिडिओ
– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा