मावळ तालुक्यातील धनघव्हाण गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत या पाणी योजनेसाठी सुमारे 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ( Dhangavahan Village Maval Taluka Bhoomipujan of tap water supply scheme under Jal Jeevan Mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील मूलभूत आणि पायाभूत विकासाकडे विशेष लक्ष देऊन काम करत असताना महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली ही पाण्याची समस्या लवकरच कायमची मिटणार असून गावातील सर्व नागरिकांना पिण्याकरीता आता शुद्ध पाणी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी याबद्दल व्यक्त केली. या भूमिपूजन समारंभास पवन मावळ भागातील जेष्ठ मान्यवर, धन गव्हाण चे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आंदोलनाला मोठे यश! पुढील निर्णय होईपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावर टोलमाफी, मंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थित उपोषण स्थगित
– मोरया महिला प्रतिष्ठान तर्फे घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान