छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असेलल्या मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिभक्तांचा रावेत जवळ अपघात झाला होता. या अपघातात तब्बल 33 शिवभक्त जखमी झाले होते. त्या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी शिवभक्तांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त सर्व शिवभक्तांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून करण्याचा दिला शब्द.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 10 मार्च रोजी मावळ तालुक्यातील शिलाटणे या गावातील शिवप्रेमी युवक शिवजयंतीनिमित्त शिवज्योत घेवून येत असताना ताथवडे रावेत जवळ त्यांच्या टेम्पोला पाठीमागच्या बाजूने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. या अपघातात जवळजवळ 33 शिवभक्त जखमी झाले होते. सदरील अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून या अपघातग्रस्तांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाईल, असे आश्वासन दिले. ( Shivbhakt Of Shilatane Village Maval Accident In Pune CM Eknath Shinde Interacted With Injured Shiv Devotees Through Video Call )
हेही वाचा – मावळमधील जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी तत्काळ निधी द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागाला आदेश
त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी ओजस रुग्णालयांना भेटी देत अपघातग्रस्तांच्या तब्येतीची विचारपूस केली. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली.
अधिक वाचा –
– खासदारांच्या वाढदिवसासाठी अर्धवट अवस्थेतील पुलाचे घाईघाईने उद्घाटन? जांभूळ येथील भुयारी मार्ग बनतोय धोकादायक
– सोमाटणे फाटा इथे बेदरकारपणे बस चालवून पादचाऱ्याला दिली धडक, नागरिकाचा मृत्यू