छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (शुक्रवार, 10 मार्च) तिथीनुसार शिवजयंती आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कामाकोपऱ्यात शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशात पुणे जिल्ह्यातून एक धक्कायक माहिती समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा मुंबई-पुणे महामार्गावर ताथावडे इथे अपघात झाला आहे. यात जवळपास 30 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, शिलाटणे गावातील मंडळातील शिवभक्त सालाबादप्रमाणे शिवजयंतीसाठी गडावरुन शिवज्योत आणत होते. यंदा शिवज्योत ही मल्हारगडावरुन आणण्यात येत होती. यावेळी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ताथावडे इथे हे सर्वजण आले असता, एका भरधाव कंटेनरने शिवभक्तांच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर या टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात जवळपास 30 ते 35 शिवभक्त जखमी झालेत. ( Shivaji Maharaj Jayanti 2023 Shiv Devotees of Shilatne Village From Maval Taluka Had An Accident At Tathawade Pune )
जखमी शिवभक्तांना स्थानिकांनी आणि इतरांनी तातडीने जवळील पवना, पायोनियर आणि ओजस रुग्णालयांत शिफ्ट केले. जखमी शिवभक्तांपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.
अधिक वाचा –
– वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ
– महागाव इथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, महिलांसाठी विशेष व्यवसाय विकास प्रशिक्षण शिबिरही संपन्न