ग्रुपो एंटोलिन प्रा.ली. कंपनीच्या चेअर पर्सन मारीया अंटोलीन आणि ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांनी मावळ तालुक्यातील ओव्हळे गावात भेट दिली. अगोदर ग्रुपो एंटोलिन प्रा.ली. कंपनीच्या मारीया अंटोलीन व ग्रुपो एंटोलिन इंडिया टीमचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी पाहणी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर भेटीदरम्यान महिला कॅन्यूनिटी हॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुभत्या जनावरांचे वाटप करण्यात आले. तसेच जि. प. शाळेतील केलेल्या कामाची पाहण्यात आले. किचन गार्डन, हर्बल गार्डन, रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रकचर, स्मार्ट क्लास रूम आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर भात मळणी यंत्र पाहणी करण्यात आली. मारीया अंटोलीन व ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांचे गावच्या वतीने ओव्हळे गाव सरपंच स्नेहा साठे यांनी आभार मानले. ( Inauguration of Community Hall for Women in Ovale Village And Milk Cooling Center at Done village Of Maval Taluka )
ओव्हळे गाव भेटीनंतर डोणे गावाला भेट देण्यात आली. सुरुवातीला मारीया अंटोलीन आणि ग्रुपो एंटोलिन टीम इंडिया यांचे डोणे गावच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर दूध शीतकरण केंद्राचे मारीया अंटोलीन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दूध शीतकरण केंद्र व्यवसायाची सर्व प्रक्रिया सांगण्यात आली. मारीया अंटोलीन आणि गृपो अंटोलीन टीम इंडिया यांचे डोणे गावच्या डोणाई शेतकरी गटाच्या वतीने यांनी आभार व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा – जांभूळ गावातील पापड उत्पादक गटाच्या महिलांना हॅन्ड इन हॅन्ड संस्था आणि बेलस्टार यांच्याकडून मोठी मदत
सदर कार्यक्रमाला ओव्हाळे व डोणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, पोलीस पाटील आणि गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. सदर भेटीत हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत संदीप मुखर्जी, अनिल पिसाळ, दिलीप पाटीदार, अभिजीत अब्दुले, सारिका शिंदे, मोहन सोनवणे, शेखर खराडे, मनीषा कारके व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– धक्कादायक! शिवज्योत घेऊन निघालेल्या मावळमधील शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोचा ताथवडे इथे अपघात
– वडगावच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचा राज ठाकरेंच्या हस्ते मनसे वर्धापनदिनी खास सत्कार – व्हिडिओ