महाराष्ट्र शासनाच्या वतीने तरुणांना एक खास संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील तरुणांना याद्वारे शासनासोबत तरुण वयात काम करण्याची संधी मिळणार आहे. शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येत आहे, याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील तरुणांना दिली. ( Chief Minister Fellowship Program on behalf of Government of Maharashtra Announced CM Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणालेत मुख्यमंत्री?
राज्याच्या विकासात युवकांचा सहभाग असावा. त्यांच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण संकल्पना राबवण्यात याव्या. प्रशासकीय प्रक्रियांना गती देता यावी, आणि नेहमीच्या चौकडी पलिकडील विचार धोरण निर्मितीत यावा महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2015 ते 2019 या काळातही मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम राबवण्यात आला होता. तेव्हाही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या फेलोशीपचा फायदा जसा शासनाला होतोय, तसाच तरुणांनाही होतो. कमी वयात शासनासोबत काम करण्याची संधी मिळते. तरुणांच्या ज्ञानात, कौशल्यात आणि अनुभवात यामुळे भर पडते.
शासनासोबत तरुण वयात काम करण्याची संधी…. #मुख्यमंत्रीफेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तरुणांना आवाहन
✅अर्ज करण्याची अंतिम मुदत– २ मार्च २०२३
✅ अधिक माहिती– https://t.co/spmUGQszxe pic.twitter.com/RBr2mBCfHM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 26, 2023
मुख्यमंत्री फेलोशीपसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत – 2 मार्च 2023
अधिक माहिती लिंक – https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP
अधिक वाचा –
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या
– माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द