दहशत माजवण्यासाठी जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि जिवंत तीन काडतुसे जप्त करण्यात आली. ओंकार झुंगजी खेगाळे (वय 23, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राहुल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावन खेगाळे याला ताब्यात घेतले. खेगाळे हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि तीन काडतूसे आढळून आली. खेगाळे हा सराइत गुन्हेगार नाही. मात्र त्याने पिस्तूल कशासाठी बाळगले होते, याचा पोलिस तपास करत आहेत. ( Person From Vadgaon Maval Who Was Carrying Pistol To Create Terror Was Arrested By Pune Police )
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे आदींनी ही कारवाई केली.
अधिक वाचा –
– आंदोलनाला मोठे यश! पुढील निर्णय होईपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावर टोलमाफी, मंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थित उपोषण स्थगित
– शास्ती कर माफ करा, ग्रामपंचायत काळातील बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपाचे नगरपंचायत सीईओंना निवेदन