राज्यात पुन्हा एकदा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील तब्बल 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूक ( Grampanchayat Election In Maharashtra ) कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यातील या ग्रामपंचातींसाठी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ( Maharashtra Election Commission ) यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांतील एकूण 1166 ग्रामपंचायतींच्या या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच, नव्या कायद्यानुसार आता पुन्हा एकदा या सर्व ग्रामपंचायतींपासूनच राज्यात सरपंचपदासाठीची निवडही थेट जनतेतून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली. ( Maharashtra Election Commission Declare 1166 Gram Panchayat Election On 13th October 2022 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”
गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक