जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडी (बौर) शाळेचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेह संमेलन सोहळा नुकताच अगदी उत्साहात पार पडला. सदर संमेलनाचे उदघाटन बौर गावचे माजी सरपंच मारुती वाळुंज यांचे हस्ते झाले. ( Annual snehasamelan program celebrated In Zilla Parishad Primary School Brahmanwadi At Baur )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. त्यांच्या या कलागुणांना प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वाळुंजकर, उपाध्यक्ष नारायण कंक आणि इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.
स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत संघटना अध्यक्ष गणेश महाराज वाळुंजकर, सामाजिक कार्यकर्ते सतिषभाऊ वाळुंजकर, माता पालक आणि शिक्षक पालक संघ तसेच सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक तानाजी शेखरे यांनी केले. स्वागत श्रीमती रोळे मॅडम, शारदा मॅडम आणि भाविका मॅडम यांनी केले. तसेच आभार राऊत सर यांनी मानले.
अधिक वाचा –
– न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला 5 संगणक संच भेट; वडगावचे नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांचा स्तुत्य उपक्रम
– दिवड, ओव्हळे गावातील पाणीपुरवठा योजनांचे काम युद्धपातळीवर सुरु, लवकरच घरोघरी येणार जलगंगा