तळेगाव दाभाडे शहर ते पुणे महानगर पालिका भवन पर्यंत थेट पीएमपीएमएल बससेवा सुरु करण्यात यावी, यासह इतर अनेक मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर यांच्या वतीने पीएमपीएमएल चे (PMPML) व्यवस्थापकीय संचालक (MD) ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहेत मागण्या?
तळेगाव दाभाडे शहर इथे सर्वांच्या सोयीसाठी बस थांबा शेड बांधण्यात यावा, तसेच पीएमपीएमएल ( PMPML ) बस गाड्यांचे वेळापत्रक असलेला फलक बस थांब्यावर लावण्यात यावा, तळेगाव दाभाडे ते मनपा थेट बस चालू करण्यात यावी, या मागण्या घेऊन तळेगाव शहर भाजपाने पीएमपीएमएल चे (PMPML) व्यवस्थापकीय संचालक (MD) ओमप्रकाश बकोरिया यांची स्वारगेट येथील पीएमपीएमएल (PMPML) भवन इथे भेट घेतली. तसेच त्यांना मागण्यांचे निवदेन दिले.
भाजपा तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित, भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागिवंत हे यावेळी उपस्थित होते. ( Direct bus service should be started from Talegaon Dabhade to Pune Municipal Corporation PMC BJP Letter To PMPML Managing Director )
अधिक वाचा –
– न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला 5 संगणक संच भेट; वडगावचे नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांचा स्तुत्य उपक्रम
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन