ग्रुप ग्रामपंचायत कल्हाट च्या उपसरपंचपदी बुधाजी गुणाजी जागेश्वर यांची (दिनांक 27 मार्च) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सुभाष पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा ठरवलेला कार्यकाल पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ग्रुप ग्रामपंचायत कल्हाट कार्यालयामध्ये सरपंच विजया संतोष जाचक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी बुधाजी जागेश्वर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक राठोड यांनी जागेश्वर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच जावेद मुलानी, सदस्या हिना मुलानी, माजी उपसरपंच सुभाष पवार, माजी उपसरपंच कविता पवार, माजी उपसरपंच रुपाली करवंदे, माजी उपसरपंच प्रणाली आगिवले आदीजण निवडणूक प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते. ( Budhaji Jageshwar Elected Deputy Sarpanch Of Group Gram Panchayat Kalhat Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बुधाजी जागेश्वर यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसेच उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर डीजेच्या गजरात त्यांची मिरवणूक संपूर्ण गावामध्ये काढून गुलाल भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. तसेच अनेक मान्यवरांनी भेटी देऊन नुकतेच उपसरपंच झालेले बुधाजी गुणाजी जागेश्वर यांचे अभिनंदन केले. तसेच उपसरपंच पदी निवड होताच बुधाजी जागेश्वर यांनी वडगाव येथे आमदार सुनिल शेळके यांचीही भेट घेतली.
“संपूर्ण ग्रामपंचायत ही 7 सदस्यांची बॉडी आहे. यामध्ये प्रामुख्याने 6 सदस्य भारतीय जनता पार्टीचे तर एक राष्ट्रवादीचा सदस्य ते म्हणजे आता उपसरपंच झालेले बुधाजी जागेश्वर. प्रत्यक्ष दर्शनी पाहता या सर्व सदस्यांनी राजकारण न पाहता गावच्या विकासाकडे लक्ष देणे महत्त्वाचे समजले व प्रत्येकाला उपसरपंच होण्याची संधी दिली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे असलेले बुधाजी जागेश्वर यांना देखील उपसरपंच होण्याचा मान मिळवून दिला. ह्या घडलेल्या घडामोडीमुळे या ग्रामपंचायतीचा सर्व मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींने आदर्श घेणे गरजेचे आहे,” असे रोहिदास असवले टाकवे (नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष) यांनी म्हटले.
“मी या मिळालेल्या संधीचे नक्की सोनं करेल आणि सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गावाला विकास पथावरती नेण्याचा 100 टक्के प्रयत्न करणार”, असे नवनिर्वाचित उपसरपंच जागेश्वर यांनी सांगितले.
हेही वाचा – साळूंब्रे सोसायटीच्या चेअरमनपदी सतिश राक्षे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ वर्णी
दरम्यान यावेळी उपस्थित पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपअध्यक्ष बाबाजी गायकवाड, उद्योजक संतोष जाचक, प्रसिद्ध गाडा मालक नंदू शेठ असवले, गोपाळ पवळे, अमोल आगिवले, हरिभाऊ पवळे, युवराज पवळे, तुकाराम कोद्रे, रोहिदास जांभुळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आतिश मोरे, पराग सावंत, काशिनाथ जांभूळकर, भगवान लोंढे, योगेश पवळे, समाधान पवळे, रमेश जाधव, गोपीचंद महाराज कचरे, माजी उपसरपंच नवनाथ मोढवे, रवी पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते दिगंबर आगिवले, सचिन पालवे, विनायक कल्हाटकर, नवनाथ कल्हाटकर, सरपंच भिकाजी भागवत;
शिवाजी जांभुळकर, गणेश महाराज जांभळे, पुणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठान माजी अध्यक्ष सदानंद पिलाने, उद्योजक प्रकाश करवंदे, प्रसिद्ध गाडा मालक विलास असवले, शंकर आवारी, बाळू भोईरकर, लक्ष्मण चोरघे, माजी सरपंच सुरेश चोरघे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सोमनाथ चोरघे, शशिकांत कराळे, रोहिदास खुरुसुले, सागर भोईरकर, ताराबाई पवळे, सावित्रीबाई जोगेश्वर, प्रमिला पवळे, यशोदा सावंत, वैशाली जागेश्वर, संगीता पवळे, रोहिणी नंबरे , विलास पवळे. यांसह गावातील सर्व माता-पिता बंधू भगिनी, मित्र परिवार व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
(माहिती – दैनिक मावळ प्रतिनिधी : चंद्रकांत असवले)
अधिक वाचा –
– येळसे गावातील काळूबाई मंदिर परिसराचे होणार काँक्रिटीकरण, विश्वजीत बारणेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
– देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज मोरे; अटीतटीच्या निवडणूकीत 9 मतांनी विजयी