दरवर्षी प्रमाणे यंदाही मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी श्री भैरवनाथ महाराज देवाची यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. सोमवारी (दिनांक 27 मार्च) जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने उत्सवाची सांगता झाली.
रविवारी पहाटे श्री भैरवनाथ देवाचा दुग्धाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी जय मल्हार कलपथक मंडळ यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. सोमवारी दुपारी कुस्तीच्या जंगी आखाडा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कुस्तीगिरांनी आखाड्यात कुस्ती केली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सहभागी कुस्तीपटुसांठी एकूण इनाम 5,55,555 रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. ( Annual Festival Of Lord Bhairavnath At Adhale Khurd Wrestling competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. अक्षय शिंदे (उपमहाराष्ट्र केसरी) आणि पै. भारत मदने (मुंबई महापौर केसरी) यांच्यात झाली. यात पै.भारत मदने विजयी झाले, त्यांना चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील नामवंत पैलवान यावेळी आखाड्यात उतरले होते.
सरपंच प्रल्हाद भालेसेन, पै. निवृत्ती काकडे (सुवर्णपदक विजेते), पप्पूशेठ चांदेकर(उपसरपंच), मा सरपंच भाऊसाहेब भोईर, पै. योगेश भोईर (मा उपसरपंच), पै महेंद्रशेठ भोईर (युवा नेते), मा सरपंच दत्तोबा चांदेकर, अशोक जगदाळे, पै विनायक काकडे, नथु जगदाळे, पै. विशाल भोईर (मावळ केसरी), वसंत जगदाळे, पांडुरंग घोटकुले, मंगेश येवले, सोमनाथ पशाले (मा उपसरपंच), ह.भ.प .शिवाजी पशाले, तुकाराम काकडे, पै. संजय भोईर, पै. बाळासाहेब चांदेकर, पै. शुभम चांदेकर, ऋषिकेश पशाले, सुमित पशाले, सोमनाथ जगदाळे, किरण काटे, भाऊसाहेब ना भोईर, राजू भोईर, प्रदीप चांदेकर, सीताराम शेडगे, ओंकार भोईर, हर्षद येवले, प्रतिकेत भोईर, बंटी जगदाळे, विनोद भोईर, महेश भोईर, तेजस भोईर आणि अनेक मान्यवर उपस्थि होते.
अधिक वाचा –
– ‘मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार’, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार