पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उत्तम नियोजनामुळे जिल्ह्याने चालू आर्थिक वर्षात 100 टक्के निधी खर्चाचे उद्दीष्ट गाठले असून याद्वारे जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेच्या विकास आराखड्यासाठी गतवर्षापेक्षा 130 कोटींची भरीव वाढ मिळविण्यातही यश आले असून आता हा आराखडा 1 हजार 5 कोटी रुपयांचा असणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जिल्ह्यातील विकास कामे करताना शाश्वत विकासाची ध्येये नजरेसमोर ठेवून जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन करण्यात आले. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह शिक्षण आणि पर्यटनावर विशेष लक्ष देण्यात आले. ग्रामीण रस्त्यांसाठी 93 कोटी रुपये खर्च होणार असून याद्वारे 200 कि.मी.च्या ग्रामिण रस्त्यांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच 41 कोटी 52 लाख रुपये खर्चाच्या 100 किलोमीटर इतर जिल्हा मार्गाचेही नियोजन करण्यात आले आहे. ( Speeding Up Development of Pune District Through District Annual Plan Chandrakant Patil 100 Percent Expenditure In Current Financial Year )
ग्रामीण भागातील सुविधांवरही लक्ष देण्यात आले असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकरिता 236 कोटी पेक्षा अधिकचा निधी हा ग्रामपंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते स्मशानभुमी सुधारणा, घाट सुधारणा, गटर बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम आदी कामांकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 17 नगरपालिका/ नगरपंचायतींना 100 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
लघु पाटबंधारे व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी 25 कोटी रुपये देण्यात आल्याने ग्रामीण भागातील सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे. अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 60 हजार 254 शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 91 लाख रुपये देण्यात आले.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यादृष्टीने जिल्हापरिषद शाळांच्या पायाभुत सुविधांकरिता 36 कोटी 50 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेतील संगणक प्रयोग शाळा, डिजिटल टिचिंग डीव्हाईस, डिजिटल क्लास रुम यासाठी 4 कोटी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील शाळांकरितादेखील प्रत्येकी 4 कोटी 50 लाख रुपये ॲस्ट्रॉनॉमी लॅब व सायन्स लॅबकरिता देण्यात आला आहे. युवकांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी यासाठी 16 कोटी रुपये व्यायामशाळा साहित्य, ओपन जिम, क्रीडा साहित्य तसेच कबड्डी, कुस्ती आणि खो-खो मॅट खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हेही वाचा – मावळात राष्ट्रवादीला झटका; साळुंब्रे पाठोपाठ शिवली सोसायटीवरही भारतीय जनता पार्टीचा झेंडा
श्री चतुशृंगी देवस्थान येथील विकास कामाकरिता दीड कोटी, जंगली महाराज देवस्थान येथील विकासकामांसाठी 60 लाख, ओंकारेश्वर व कसबा गणपतीसाठी प्रत्येकी 40 लाख आणि पाषाण तलावाच्या सुशोभिकरणाकरिता 20 लाखांचा निधी देण्यात आला आहे. पुणे शहरातील पोलीस वसाहतींच्या सुधारणा करिता 2 कोटी रुपये, कोथरुड, दत्तवाडी पोलीस स्टेशन दुरुस्ती दीड कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीसांकरिता वाहन खरेदी करिता प्रत्येकी 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
उत्तम नियोजनाद्वारे 100 टक्के निधी वितरीत
जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत प्राप्त 100 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 875 कोटी रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनूसूचित जाती उपयोजना) साठी 128 कोटी 98 लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम) साठी प्राप्त 54 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे साकव बांधकाम या भांडवली योजनांकरिता मुख्यमंत्र्यांच्या विशेष मान्यतेने 16 कोटी 50 लाख रुपयांचा निधी समर्पित होण्यापासून रोखण्यास यश मिळाले आहे.
अधिक वाचा –
– वडगाव नगरीचे ग्रामदैवत पोटोबा महाराज उत्सवानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल; मानाचे बगाड ते कुस्त्यांचा आखाडा, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर