एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेत ( Shiv Sena ) केलेले ऐतिहासिक बंड आणि त्यातून राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष अजून किती दिवस चालेल हे काही सांगता येत नाही. परंतू, या सर्व धामधुमीत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गट अशा उड्या मारलेल्या नेत्यांचे भविष्यात काय होणार ही गोष्ट मात्र नेहमीच चर्चिली जाते. मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे ( MP Srirang Appa Barne ) हे देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गोटात दाखल झाले. तेव्हापासूनच आगामी लोकसभेच्या निवडणूकीत काय होणार, याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता यावर स्वतः खासदार बारणे यांनी भाष्य केले आहे. ( MP Srirang Appa Barne Commented on Maval Lok Sabha Constituency Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी ( Pimpri ) येथे पत्रकार परिषद ( Press Conference ) घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य केले. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत बैठक आयोजित केली होती. यामध्ये मावळ लोकसभेबाबत चर्चा झाली आहे. कोणत्या पक्षातून आणि चिन्हावरून निवडणूक लढवायची, हे ठरले आहे’, असे बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे मावळ लोकसभेबाबत होणाऱ्या तर्कवितर्कांना पूर्णविराम द्यावा. निवडणुकीवेळी योग्य ते ठरवू, असेही बारणे पुढे म्हणाले. ( MP Srirang Appa Barne Commented on Maval Lok Sabha Constituency Election In Press Conference At Pimpri )
अधिक वाचा –
‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा
अखेर यादी आलीच…! जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, पाहा पुण्याचे पालकमंत्री कोण?