नांगरगाव इथे तरुणांच्या एका ग्रुपने भेकर या वन्यजीवाचे प्राण वाचवले आहे. नांगरगाव येथील काही तरुण वरसोली येथून वळवण धरणाकडे फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना तिथे एक जखमी भेकर दिसले. त्यांनी लगेचच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वनखात्याला संपर्क करुन याची माहिती दिली. त्यामुळे याच जखमी भेकराचा जीव वाचला आहे.
कौशल दुर्गे, प्रणव दुर्गे, राहुल दुर्गे, रोहित भांगरे, तुषार भांगरे, आतिश भांगरे, निखिल ढोरे, आकाश भांगरे, वन रक्षक संदिप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भेकरावर प्रथमोपचार करुन त्यास पुणे येथे पाठवण्यात आले आहे. ( youth group of nangargaon lonavala saved life of an injured barking deer )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे
– “निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”