व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, January 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे

लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Shrirang-Barne-maval

Photo Courtesy : FB /


मावळ लोकसभा मतदारसंघातील मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ लोकसभा मतदारसंघ रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात येतो. मुंबई विभागात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, डोंगरगाव, खंडाळा हा मावळ मतदारसंघातील भाग येतो. मुंबई विभागातील मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामासंदर्भात खासदार बारणे यांनी मुंबई रेल्वे विभागाचे डीआरएम रजनीश के. गोयल यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्प आणि नवीन कामे हाती घेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. ( MP Shrirang Barne took information about works under Railway Department in Maval Lok Sabha Constituency )

मुंबई मध्य रेल्वे अतंर्गत येणाऱ्या लोणावळा ते मुंबई या मार्गातील गेट क्रमांक २२ अंबिवली, २३ भिवपुरी, २५ अषाने कोषाने, २६ सावरगाव, २७ किरवली हे सर्व कर्जत तालूक्यातील तसेच गेट क्रमांक ३४ डोंगरगाव, २९ खंडाळा गावठाण आणि गेट क्रमांक ३१ जुना खंडाळा (लोणावळा ) येथे रेल्वे ओव्हर ब्रिजचे कामे केली जाणार आहेत.

“ही कामे लवकरात लवकर सुरू करावीत. पनवेल ते खारकोपर लोकल सेवा सुरू आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाला गती देवून पूर्णत्वाकडे नेण्याबाबत सूचना केल्या. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजच्या कामाला गती द्यावी. अनेक नवीन कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्यावी. याशिवाय नेरळ ते माथेरान दरम्यान चालू असलेल्या ट्राय ट्रेनचा आढावा घेतला. त्यातील काही त्रुटीमध्ये सुधारणा करावी. पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. पनवेल रेल्वे सेवेचाही आढावा घेतला.”

अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

अधिक वाचा –
– “निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”
– आमदार सुनिल शेळके यांची तळेगावमधील इफ्तार पार्टीला हजेरी; मुस्लिम बांधवांना दिला संदेश


Previous Post

“निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”

Next Post

सॅल्यूट! नांगरगावातील तरुणांनी वाचवले जखमी भेकराचे प्राण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
life-saved-injured-barking-deer

सॅल्यूट! नांगरगावातील तरुणांनी वाचवले जखमी भेकराचे प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Digital battle in Mumbai Municipal Elections BJP leads campaign with Marvel style campaign

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’ स्टाईल कॅम्पेनद्वारे भाजपाची प्रचारात आघाडी

January 12, 2026
For first time after independence electricity will reach Rajmachi area in Maval DPDC approves electricity project

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच मावळातील राजमाची परिसरात पोहोचणार वीज ; जिल्हा नियोजन समितीतून 4 कोटी 64 लाखांचा वीज प्रकल्प मंजूर

January 12, 2026
Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची आज होणार निवड

January 12, 2026
Unknown-Dead-Body

Vadgaon Maval : वडगाव मावळमधील पोटोबा महाराज मंदिराजवळ अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

January 12, 2026
Pune Zilla Parishad Administrator Gajanan Patil visits Zilla Parishad School in Navlakh Umbre

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक गजानन पाटील यांची नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषद शाळा आणि पशूवैद्यकीय दवाखान्यात भेट

January 12, 2026
Chief Minister Devendra Fadnavis master plan and a new era of infrastructure in Mumbai

मायानगरीचा महाकायापालट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन’ आणि मुंबईत पायाभूत सुविधांचे नवे युग

January 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.