मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नूर मस्जिद तळेगाव दाभाडे स्टेशन इथे मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे शुक्रवार, दिनांक १४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या. ( iftar party at talegaon dabhade in presence of maval mLA sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच यावेळी आमदार शेळकेंसह राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अमीर (बाबा) मुलाणी, माजी नगरसवेक मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष आयुब सिकीलकर, इक़बाल शेख, मज़हर खान, सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद, जेष्ठ पत्रकार अमीन खान, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष सोहेल शिकीलकर, जुबेर सवार, अतीक शेख, मंसूर शाह, इजाज शिकीलकर, अय्याज नालबंद, तौसीफ जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.
#मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नूर मस्जिद तळेगाव दाभाडे स्टेशन येथे रमजान महिन्याचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे शुक्रवार दि.१४ रोजी आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या.#ramjanmubarak #maval #ncp pic.twitter.com/K883RxtxgR
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 15, 2023
काय असते इफ्तार पार्टी?
गेले काही वर्षांपासून सामाजिक सलोखा-बंधुभाव तसेच धर्मनिरपेक्षता जोपासावी आणि वृद्धिंगत व्हावी या कारणाने अनेक पक्ष, संस्था, संघटना, मंडळे रोजा इफ्तार पार्टी आणि ईद मीलन पार्टीचे आयोजन करतात. सामाजिक सलोख्यासाठी खूप गरजेचा महत्त्वाचा हा उपक्रम आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात. जातीय सलोखा, जिव्हाळा जोपासण्याच्या उद्दात हेतूचे रोजा इफ्तार पार्टी नावाने कार्यक्रम ठेवले जातात.
अधिक वाचा –
– बोरघाट बस अपघात । मुख्यमंत्री शिंदेंकडून दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
– मावळ तालुक्यातील विकास कामांबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळकेंची आढावा बैठक । Vadgaon Maval