मावळ तालुक्यातील विकास कामांबाबत जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागांची आढावा बैठक गुरुवार, दिनांक 13 एप्रिल रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथे संपन्न झाली. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रस्त्यांची जी कामे सुरु आहेत त्या कामांना गती देऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सुचना यावेळी आमदार शेळकेंनी दिल्या. तसेच लोणावळा, कान्हे रुग्णालय, वडगाव प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन आणि तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयांच्या कामांनाही वेग देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदारांनी दिल्या. ( Review meeting of MLA Shelke with officials of various departments regarding development works in Maval taluka )
जलयुक्त शिवार 2.0 अभियान अंतर्गत मावळमधील ज्या 13 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्या गावातील आराखड्याबाबत चर्चा करुन ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रमाणात कामे या योजनेतून करण्याची सूचना आमदार शेळके यांनी केली.
यावेळी आमदार सुनिल शेळके, कार्यकारी अभियंता विजय पाटील, अशोक शेटे, धनराज दराडे, उपअभियंता धनराज पाटील, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पीएमआरडीए (PMRDA) उपअभियंता अमित तिडके, तसेच सर्व शाखा अभियंता, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके
– मावळमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी 73 लाखांचा निधी मंजूर – बाळा भेगडे