कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कान्हे रुग्णालयाचे काम सध्या प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत असेल, अशी आशा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केली. ( 9 lakh fund for construction of sub district hospital and trauma care center at kanhe maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटी 12 लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कान्हे रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असुन अंतिम टप्प्यात आहे.#maval #sunilshelke #development pic.twitter.com/TZeX2i5dYu
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 13, 2023
‘कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटी 12 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कान्हे रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असुन अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन महिन्यांत बांधकाम पुर्ण झाल्यानंतर रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करील. या रुग्णालयातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी दर्जेदार उपचार मिळतील, हा विश्वास आहे.’ अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
अधिक वाचा –
– भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक
– मावळमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी 73 लाखांचा निधी मंजूर – बाळा भेगडे