लोणावळा शहर पोलिसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या मुद्देमालासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.
लोणावळा शहरात मागील काही दिवसांमध्ये जबरी चोरी आणि चोरीच्या घटना वाढल्या होत्या. नांगरगाव भागात मागील आठवड्यात चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. याचा तपास करत असताना लोणावळा शहर पोलीस पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चिंतन लक्ष्मण पाठारे (वय १९, रा. ओळकाईवाडी लोणावळा), शेखर मारुती मंजुळे (वय १९, रा. केवरे कुसगाववाडी ता. मावळ), आकाश भरत ओहाळ (वय २४, रा. केवरेगाव ता. मावळ), सबरोज अहमद निहाज अहमद मुजावर (वय २४, रा. डोंगरगाव ता. मावळ), रफिक शमशेर पठाण (वय २४, रा. देवणी जि. लातूर, सध्या राहणार लोणावळा), रविशंकर रामदास गौतम (वय २०, रा. कानपूर सध्या रा. वलवण पुलाजवळ लोणावळा), निखिल महेंद्र निकाळजे (वय २६ रा. नांगरगाव लोणावळा) या सात जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींकडून एकूण 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार, पोलीस उप निरीक्षक लतिफ मुजावर, सहाय्यक फौजदार सुनील वाणी, पोलीस हवालदार मयूर आबनावे, पोलीस नाईक फरांदे, पोलीस हवालदार राजेंद्र मदने, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, रमेश उगले, विरसेन गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अधिक वाचा –
– भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक
– कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके