मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते स्व. तुकाराम कोद्रे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमानिमित्त त्यांचे बंधू पप्पू कोद्रे आणि कै. बुवाभाऊ कोद्रे यांच्या मित्रपरिवारच्या वतीने व लाईफ व्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर टाकवे बुद्रुक इथे घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 77 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान या तपासणीमध्ये 7 मोतिबिंदू रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत कऱण्यात येणार आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ( Free eye check up camp at Takwe Budruk on occasion of Dasakriya ceremony of late BJP Maval activist Tukaram Bua Kodre )
भाजपाचा हाडाचा कार्यकर्ता हरपला…
कै. तुकाराम उर्फ बुवा कोद्रे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने भाजपमध्ये मोठी खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे ते कट्टर समर्थक होते. टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांचे ते अतिशय जवळचे सहकारी. कै. तुकाराम कोद्रे यांना सर्व बुवाजी या नावाने ओळखत. यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा व्यक्ती गेला तरीही त्यांनी कधी पक्षभेद न पाहता माणूस म्हणून तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंत काम केले. त्यांच्यामार्फत अनेकांच्या समस्या सुटल्या गेल्या. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या मित्र परिवाराला खूप मोठा धक्का बसला आहे.
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! लोणावळा आणि पुणे शहर परिसरात चोऱ्या करणारी टोळी गजाआड, मुद्देमालासह 7 जण ताब्यात
– कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके