Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कामशेत येथून इंद्रायणी नदी ओलांडून नाणे गावाकडे जाणारा प्रमुख कामशेत – नाणे रस्ता जागोजागी दूरवस्था होऊन प्रचंड धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसानंतर जागोजागी रस्ता खराब झाला आहे, खड्डेमय झाला आहे, तसेच रस्त्यालगतची साईडपट्टी, मुरूम माती वाहून गेल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
कामशेत-नाणे मार्गावरून दररोज हजारो नागरिक, ज्यात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि पर्यटक प्रवास करीत असतात. या सर्वांनाच सध्या जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र, परिस्थिती इतकी गंभीर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित विभाग, यंत्रणा यांनी अद्याप ठोस पाऊल न उचलल्याने, उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
लोकप्रतिनिधींनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अन्यथा खड्डेमय रस्ता, खचलेला रस्ता यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

