व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

दुर्मिळ सापाच्या नोंदीमुळे मावळ परिसरातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2026
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कान्हे येथे अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा बिनविषारी इंडियन स्मूथ स्नेक (गजरा साप) आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दुर्मिळ सापाच्या नोंदीमुळे मावळ परिसरातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

कान्हे येथील रहिवासी विक्रम सातकर यांच्या घराशेजारी साप असल्याची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद ओव्हाळ व सामाजिक कार्यकर्ते शशांक सातकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरालगत मोकळे रान आणि नदीचा परिसर असल्यामुळे सुरुवातीला तो नाग, घोणस किंवा धामण असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बारकाईने पाहणी केल्यानंतर तो अत्यंत दुर्मिळ इंडियन स्मूथ स्नेक (Wallophis brachyura) असल्याचे स्पष्ट झाले.

सदर सापाचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि वन्यजीव संशोधक रौनक खरे यांच्या उपस्थितीत त्याला योग्य नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले.

हा साप नुकताच अंड्यातून बाहेर आलेला असून त्याची लांबी सुमारे २४ सेंटीमीटर असल्याचे निरीक्षण करण्यात आले. यावरून संबंधित परिसरात या दुर्मिळ प्रजातीचे प्रजनन होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वन्यजीव संशोधक जिगर सोलंकी यांनी सांगितले की, “इंडियन स्मूथ स्नेक हा भारतातील काही विशिष्ट भागातच आढळणारा अत्यंत लाजाळू, शांत आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे. शरीरावरील गुळगुळीत खवल्यांमुळे त्याला ‘स्मूथ स्नेक’ असे म्हटले जाते. हा साप मानवी वस्त्यांमध्ये क्वचितच दिसतो. त्यामुळे त्याची नोंद होणे ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कान्हे परिसरात या सापाचे अस्तित्व आढळणे म्हणजे वाढत्या शहरीकरणानंतरही मावळची जैवविविधता समृद्ध असल्याचा पुरावा आहे. या दुर्मिळ प्रजातींचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”

वन्यजीव तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात साप आढळल्यास घाबरून त्यांना इजा करू नये. तत्काळ वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधून सुरक्षितरीत्या त्यांचे रेस्क्यू करण्यास सहकार्य करावे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.