Dainik Maval News : पवना धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात वेगाने पाण्याची आवक होत असून यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि. २२ जुलै) सायंकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात ८९.८२ टक्के अर्थात जवळपास नव्वद टक्के पाणीसाठा झाला आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूनच्या अखेरीस पावसाला सुरूवात झाली. जुलैचा पहिला आठवडा सलग जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पवना धरण आठवड्याभरात १६ टक्क्यांवरून पन्नाशीपार गेले. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर ओसरला होता. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस होत होता, त्यामुळे पाण्याची आवक होत होती. परंतु गेली दोन ते तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
मावळमधील चाळीस ते पन्नास गावे, लहान मोठे उद्योग व्यवसाय सहीत पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरण हे प्रमुख जलस्त्रोत असल्याने धरणातील सध्याचा पाणीसाठा हा सर्वांसाठीच दिलासादायक ठरला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन
– मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

