मावळ तालुक्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केल्याची घटना गुरुवार, 13 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून ‘भाऊसाहेब…तुम्ही हे काय केलं?’ अशी चर्चा होत आहे.
खडकाळा कामशेत ग्रामपंचायत चे ग्रामसेवक विलास तुकाराम काळे ( वय 45, रा. रा. विघ्नहर अपार्टमेंट रामटेकडी हडपसर पुणे) यांना रुपये 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने रंगेहात अटक केली आहे. ( Kamshet gram panchayat village development officer arrested red handed while taking bribe Maval taluka news )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कामशेत (खडकाळा) हद्दीत जागा घेऊन पत्र्याचे शेड बांधले होते. त्या शेडची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विलास काळे यांच्याकडे अर्ज केला होता. यावेळी नोंद करण्यासाठी ग्रामसेवक यांनी रुपये 12 हजार लाचेची मागणी केली.
त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस अंमलदार सौरभ महाशब्दे, रियाज शेख, पांडुरंग माळी आदींनी गुरुवार, दिनांक 13 एप्रिल दुपारी त्या भागात सापळा रचला, आणि ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी 1 वाजता ग्रामसेवक काळे यांना लाच स्विकारताना रंगेहात अटक केली. शुक्रवारी विलास काळे यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अधिक वाचा –
– बाळा भेगडे यांनी खरडपट्टी काढलेल्या तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोलीत बदली; तालुक्यात चर्चांना उधाण
– मोठी बातमी! मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची गडचिरोलीत बदली, ‘हे’ असणार नवीन तहसीलदार