मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाली आहे. तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली. मात्र त्यांच्या या बदलीमागे मावळचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कारण असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. याचे कारण म्हणजे, काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची काढलेली खरडपट्टी.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ याठिकाणी अचानक भेट देऊन स्टिंग ऑपरेशन केले होते. यावेळी तहसीलदार कार्यालयात काही एजंटचा हस्तक्षेप होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. सर्व सामान्य नागरिकांना तासन तास बाहेर उभे राहावे लागत असल्यामुळे बाळा भेगडे यांनी तेव्हा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना चांगलेच धारेवर धरले होते. ( Madhusudan Barge Maval Taluka Tehsildar Transferred To Dhanora of Gadchiroli Due of Bala Bhegade complaint )
सरकारी आकार पडाच्या जमिनी शेतकऱ्यांना न देता उद्योजक आणि एजंट लोकांच्या घशात घालण्याचे काम बर्गे यांच्या कार्यकाळात करण्यात आल्याचा आरोप अनेकदा भाजपाकडून लगावण्यात आला. तसेच जाणीव पूर्वक राजकीय दबावापोटी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम तहसीलदारांच्या माध्यमातून केले जात होते, असाही आरोप लगावण्यात आला.
त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून अनेक नागरिकांच्या तक्रारी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे आल्या होत्या. त्याचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्यामुळेच बर्गे यांची गडचिरोली येथे बदली झाल्याचे बोलले जात आहे.
अधिक वाचा –
– Breaking! मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची गडचिरोलीत बदली, ‘हे’ असणार नवीन तहसीलदार
– कार्ला ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय!! ‘ते’ बांधकाम 10 दिवसांत काढून घेण्याची नोटीस काढल्यानंतरच उपोषण मागे