मावळ तालुक्यातील कार्ला इथे दोन दिवसांपासून सुरु असलेले ग्रामस्थांचे उपोषण ठोस आश्वासनानंतर बुधवारी (दिनांक 12 एप्रिल) रोजी मागे घेण्यात आले.
कार्ला गावातील जमीन गट नं. 148 मधील अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम तत्काळ काढा, या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांकडून मंगळवार, दिनांक 11 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. कार्ला ग्रामस्थांच्या या उपोषणाला पंचक्रोशीतून अनेक ग्रामपंचायत आणि संघटनांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ( hunger strike of villagers of Karla ended after Gram Panchayat issued notice to remove unauthorized construction )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अखेर बुधवारी (दिनांक 12 एप्रिल) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, कार्ला ग्रामपंचायत सरपंच यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच, कार्ला ग्रामपंचायतीने सदरचे अनधिकृत बांधकाम येत्या दहा दिवसात काढून घेण्याची नोटीस दिल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले. कार्ला ग्रामस्थ यांच्यावतीने भाऊसाहेब हुलावळे, गणेश वायकर, समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सुखदेव हुलावळे, योगेश हुलावळे, विनोद हुलावळे हे उपोषणाला बसले होते.
“कार्ला ग्रामपंचयत मार्फत कार्ला (ता. मावळ) येथे प्रथम दर्शनीय केलेल्या चौकशीनुसार गट 148 मध्ये केलेले बांधकाम शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 53 अन्वये 10 दिवसाची अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्याची मुदतीची नोटीस आज (दिनांक 12) रोजी ग्रामपंचायत मार्फत देत आहोत, तरी आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे”, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना तहसिलदार मधुसूधन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सरपंच दिपाली हुलावळे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ उत्साहात; पद यात्रेत भाजपासह अन्य पक्षांचे कार्यकर्तेही सामील
– मोरवे शाळेत हस्तकला कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम
– गांजा विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात अटक, देहूरोड पोलिसांची कारवाई, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त