पवन मावळ भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवे इथे हस्तकला कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी मोरवे शाळेत एक दिवसाची हस्तकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे हे शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवतात असतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हस्तकला कार्यशाळा यामध्ये विद्यार्थ्यांनी पुठ्याची घरं, वृक्षारोपण, काड्या विविध कला कृती साकारली होती. माती व खड्यांचा वापर करून आकर्षक गार्डन तयार केले होते. प्राणी पक्ष्यांची प्रतिकृती तयार केली होती. मुलांनी या हस्तकला कार्यशाळेचा आनंद घेतला. मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी या डिजिटल दुनियेत मुलांनी स्वतःच्या कलागुणांना वाव देणं ही काळाची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली. ( Handicraft workshop held at Zilla Parishad Primary School Morve village maval taluka )
अधिक वाचा –
– वाचन वेड संस्था आणि अभंग प्रतिष्ठानकडून मावळ तालुक्यातील 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप
– गांजा विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात अटक, देहूरोड पोलिसांची कारवाई, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त