महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांच्या वडीलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. क्षीरसागर यांच्या कौटुंबिक वादाने पोलिस स्टेशनची पायरी गाठली असून आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केला आहे. नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडला. याबाबत रविंद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ( fir against ncp mla sandeep kshirsagar for assaulting his father ravindra kshirsagar beed news )
कौटुंबिक वादातील कारणातून, ‘संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि माझ्यासह माझ्या बहिणींना घराबाहेर हाकलून दिले’, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. यावरुन संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर यांचा परिचय…
आमदार संदीप क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबातील उभरते नेतृत्व आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. संदीप क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकले. यात त्यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता.
अधिक वाचा –
– वाचन वेड संस्था आणि अभंग प्रतिष्ठानकडून मावळ तालुक्यातील 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप
– मोरवे शाळेत हस्तकला कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम