देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’ सुरु करण्यात येईल, अशी घोषणा खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः केली होती. त्यानंतर राज्यातील अनेक भागात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. ( Swatantryveer Savarkar Gaurav Yatra in Lonavla city by bjp )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसांपूर्वीच तळेगाव दाभाडे शहरात देखील भव्य यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर आज बुधवार, दिनांक 12 एप्रिल रोजी लोणावळा शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता यावे, यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा भांगरवाडी पर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.
या यात्रेचे मुख्य आयोजक लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षाचे कार्यकर्ते देखील या पद यात्रेत सामील झाले होते. कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, कोमल काळभोर शिंदे, शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांसह अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक पद यात्रेत सामील झाले होते.
अधिक वाचा –
– मोरवे शाळेत हस्तकला कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम
– राष्ट्रवादीच्या लोकप्रिय आमदारावर स्वतःच्या जन्मदात्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप, गुन्हा दाखल