मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील तहसीलदार संवर्गातील एकूण 32 जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश पत्रक शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून काढण्यात आले आहे. यात मावळ तालुक्याचे सध्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली आहे. ( Tehsildar Madhusudan Barge of Maval taluka transferred to Dhanora taluka of Gadchiroli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तहसीलदार मधुसूदन बर्गे हे कर्तव्यदक्ष आणि तितकेच वादातीत अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात चांगले काम केले होते. तसेच तालुक्यात कुठेही आंदोलन मोर्चे असल्यास तहसीलदार बर्गे स्वतः तिथे जाऊन आंदोलकांशी चर्चा विनिमय करत असत. काही दिवसांपूर्वी सोमाटणे टोलनाका बद्दल त्यांनी स्पष्ट भुमिका घेतली होती. मात्र अनेक राजकीय नेत्यांकडून आरोपांच्या फैरी त्यांच्यावर सतत झडत राहिल्या. अशात त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विक्रम देशमुख असणार नवे तहसीलदार…
मधुसूदन बर्गे यांची बदली होत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार, याची सर्वत्र चर्चा होत असताना विक्रम देशमुख हे मावळचे नवे तहसीलदार असतील असे समजत आहे.
अधिक वाचा –
– कार्ला ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय!! ‘ते’ बांधकाम 10 दिवसांत काढून घेण्याची नोटीस काढल्यानंतरच उपोषण मागे
– लोणावळा शहरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ उत्साहात; पद यात्रेत भाजपासह अन्य पक्षांचे कार्यकर्तेही सामील