मावळ तालुक्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दलित वस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील दलित वस्तीचा विकास करण्याच्या हेतूने निधीची मागणी केली असता पहिल्या टप्प्यात एकूण 73 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( 73 lakhs sanctioned for development of Dalit settlements in Maval taluka by Bala Bhegade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण ७३लक्ष रुपयांचा निधी मंजूर..!
मा.पालकमंत्री ना.@ChDadaPatil यांचे मनःपूर्वक आभार..! pic.twitter.com/WhuDKNptWY
— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) April 13, 2023
मावळ तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी:
रमाई घरकुल वसाहत (ग्रा.जांभूळ )नळ पाणी पुरवठा करणे – 15लक्ष
ग्रामपंचायत डाहुली प्रकाश व्यवस्था करणे – 3,99,832 रुपये
वाघजाई वस्ती (ग्रा. कुसगाव पमा) रस्ता करणे – 5 लक्ष
दलित वस्ती अहिरवाडे (ग्रा. चिखलसे ) रस्ता करणे – 10 लक्ष
राजश्री शाहूनगर (ग्रा.सोमाटणे )रस्ता करणे – 17 लक्ष
काळभोर दलित वस्ती (ग्रा. सुदवडी ) बंदिस्त गटर करणे – 2,00,146 रुपये
दलित वस्ती क्र.3(ग्रा.इंदोरी ) रस्ता करणे – 10 लक्ष
बौद्ध वस्ती (ग्रा.वेहेरगाव ) नळ पाणी पुरवठा ( पाण्याची टाकी )करणे – 10 लक्ष
अधिक वाचा –
– भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक
– बाळा भेगडे यांनी खरडपट्टी काढलेल्या तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोलीत बदली; तालुक्यात चर्चांना उधाण