व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी

मावळ तालुक्यातील श्री साईबाबा सेवाधाम, कान्हेफाटा इथे दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम - 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Disaster-Friend-Training-Camp

Photo Courtesy : Nilesh Garade


राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) पुणे यांच्यावतीने आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील श्री साईबाबा सेवाधाम, कान्हेफाटा इथे दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम – 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेश देशमुख हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक आहेत. ( Disaster Friend Training Camp At Kanhe Phata In Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अगदी पहिल्या दिवसापासूनच या प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वतः डॉ. राजेश देशमुख (मा जिल्हाधिकारी), हिम्मत खराडे (निवासी उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले. मावळ, मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र असे एकूण 87 तरुण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेत.

सदर 12 दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत आपत्ती व आपत्तीचे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भुकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम शवाच्छोश्वास (CPR), आग व आगीचे प्रकार, व्हर्टीकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तिथे जाऊन मदत कार्य करून जिवितहानी टाळू शकतात.

मानवी कुबडी, पाठीवर सरळ घेणे, अग्निशमनदल कर्मचारी उचल, अग्निशमन दल रांगणे, जिन्यावरून खाली आणणे, 2/3/4 हातांची बैठक, विविध आपत्कालीन स्ट्रेचर इत्यादी गोष्टीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर यांचे नियोजनाअंतर्गत सायली चव्हाण आणि ओंकार पोखरकर हे समन्वय म्हणून कार्य करत आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनील गायकवाड, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश संपतराव गराडे यांनी सहकार्य केले.

अधिक वाचा –

– फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया
– दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
– गुडन्यूज! शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबतच जानेवारीचे धान्य, मोबाईल क्रमांक जोडण्याचेही आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील बालगोपाळांसाठी स्तुत्य उपक्रम, अल्प दरात संस्कार वर्ग सुरु, वाचा अधिक

Next Post

कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-singing-Competition

कोण होणार लोणावळ्याचे महागायक-महागायिका? गीत गायन स्पर्धेसाठी नोंदणीचे आवाहन, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.