पुणे : आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित तालुकास्तरीय समित्यांच्या बैठकांचे २१ एप्रिलपासून आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार सर्व तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीची बैठक संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित तारखेला तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ( taluka level meetings under chairmanship of Tehsildars to solve problems of ex soldier )
पुरंदर तालुक्याची बैठक २१ एप्रिल, इंदापूर २५ एप्रिल, भोर २७ एप्रिल, बारामती २ मे, दौंड ४ मे, शिरूर ९ मे, खेड ११ मे, जुन्नर १६ मे, मुळशी १८ मे, मावळ २३ मे, हवेली २४ मे रोजी तर वेल्हे तहसील कार्यालयातील बैठक ३० मे रोजी होईल. आंबेगाव तालुक्यातील बैठक १६ मे रोजी दुपारी ३ वा. होईल.
आजी, माजी सैनिकांनी तालुकापातळीवरील अडीअडचणी असल्यास संबंधित तहसिलदार कार्यालयामध्ये बैठकीच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) एस. डी. हंगे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील विकास कामांबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळकेंची आढावा बैठक । Vadgaon Maval
– कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके