Dainik Maval News : पंचायत समिती मावळ च्या नवनिर्वाचित सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या समितीच्या सदस्या म्हणून निवड झाल्यानंतर सुनीता येवले यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या समितीच्या माध्यमातून शेतकरी, दुग्ध व्यावसायिक यांच्याशी संबंधित सर्व घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे येवले यांनी सांगितले
पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडीमुळे सर्वस्तरातून सुनिता येवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान