ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रविवार, १६ एप्रिल रोजी खारघर इथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून लाखो अनुयायी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य अनेक नेते या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत. या अनुषंगाने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 25 ते 30 लक्ष अनुयायांच्या साक्षीने खारगर-नवी मुंबई इथे रविवारी हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असणार आहे. त्यामुळे शुक्रवार मध्यरात्रीपासून ते रविवार मध्यरात्रीपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून आदेशपत्र जारी करण्यात आले आहे. ( Maharashtra Bhushan Award Ceremony Entry ban for heavy vehicles on nh 4 including Mumbai Pune Expressway )
काय आहे आदेशपत्र?
‘अपर जिल्हा दंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केलेल्या संदर्भीय अहवालानुसार दिनांक १६.०४.२०२३ रोजी आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदरचा गौरव सोहळा खारघर नवी मुंबई येथे असल्याने सदर कार्यक्रमाकरीता रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्हातुन तसेच बाहेरील राज्यातुन सुमारे १५ ते २० लाख श्रीसदस्य / अनुयायी खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवीमुंबई येथे येणार आहेत.’
‘सद्यस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर चौपदरीकरणाचे कामकाज चालू असल्यामुळे सदर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बोटलनेक पॉईट तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे दिनांक १४.०४.२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असून दिनांक १५.०४.२०२३ व १६.०४.२०२३ रोजी शनिवार व रविवार अशी लगातार ३ दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने, नागरिक व पर्यटक तसेच श्री. सदस्य / अनुयायी हे मोठया संख्येने आपआपली वाहने घेवून सदर मार्गावरुन प्रवास करणार आहेत. अशा वेळेस सदर मार्गावरून अवजड वाहतुक सुरु राहील्यास वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर प्रश्न उद्भवू शकतो.’
हेही वाचा – मोठी बातमी! प्रसिद्ध निरुपणकार डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
‘त्यामुळे, मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्तव खारघर ते इन्सूली (सांवतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जूना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्यीय मार्ग वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रक, मोटे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीबाबत, दिनांक १४.०४.२०२३ रोजी २४.०० वाजल्यापासून ते दिनांक १६.०४.२०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत वरील महामार्ग व इतर राज्य मार्गवर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, टूक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील.’ असे आदेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे.
या वाहनांना असणार सुट…
दुध, पेट्रॉल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन, आप व भाजीपाला इ. जीवनावश्यक वस्तू बाहुन नेणाऱ्या वाहनांना हे बंदी आदेश लागू होणार नाहीत. तसेच महामार्ग/राज्य मार्ग च्या रस्तारुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. तथापि, वाहतूकदारांनी सबंधीत वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांचेकडून प्रवेशपत्र घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठका
– मावळ तालुक्यातील विकास कामांबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार शेळकेंची आढावा बैठक । Vadgaon Maval